बेस्ट संप: मनसे रस्त्यावर उतरली, कोस्टल रोडचं काम बंद पाडलं, पहिला दणका सत्ताधाऱ्यांना

मुंबई : बेस्ट संपावर तोडगा न काढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे आणि पहिला दणका कोस्टल रोडच्या बांधकामाला आणि काँट्रॅक्टरला दिला आहे. कालच मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे.
वरळी येथे सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दर्शवला आहे तसेच मनसे कार्यकर्त्यांनी काम करणारे काँट्रॅक्टरचे कर्मचारी तसंच तेथील सर्व मशीन्स हलवण्यास भाग पाडून त्यांना हुसकावून लावले आहे. तसेच बाजूच्या तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना सुद्धा टाळं ठोकलं आहे. त्यामुळे जर सत्ताधारी शिवसेनेला संप मिटवता येत नसेल तर, तोपर्यंत कोस्टल रोडचं सुरु करु देणार नाही असा थेट इशारा सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान आज स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी ११ वाजता मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बेस्ट संपाचा आज सलग ७वा दिवस असून मुंबईकर मात्र चांगलेच हैराण झाले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं