राज्यातून राज्यसभेवर गेलेले नेते सुभाष देसाईंना 'महाराष्ट्रातील तडीपार' वाटतात ?

नेरळ : शिवसेना वरिष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे संपले आहेत. सुभाष देसाई म्हणाले छगन भुजबळ तुरुंगात गेला, गणेश नाईक घरी बसला आणि नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झाला असा एकेरी शब्द प्रयोग करत टीका केली.
विशेष म्हणजे नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीत राज्यसभेवर गेलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उल्लेख सुभाष देसाई यांनी ‘महाराष्ट्रातून तडीपार’ असा केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वच पक्षातील प्रतिनिधी राज्यसभेवर गेले असून त्यांचा नुकताच रीतसर शपथविधी सुद्धा पार पडला होता आणि हे संसदीय मानाचं पद म्हणून ओळखल जात.
परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्यसभेमार्फत दिल्लीत गेलेल्या नारायण राणेंचा सुभाष देसाई यांनी थेट ‘महाराष्ट्रातून तडीपार’ असाच उल्लेख केल्याने सर्वच अवाक झाले आहेत.
आता यावर नारायण राणे आणि नितेश राणे कसं उत्तर देणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं