निवडणूक इफेक्ट: मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकराना निवडणुकीपूर्व मोठा दिलासा मिळणार आहे. स्वयंपुनर्विकास धोरणालाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच, रखडलेले एसआरए प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे SRA प्रकल्पांत रखडलेल्या १० लाख कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. याचबरोबर, एसआरए ट्रांझिट्स कॅम्पमधील घुसखोरांना देखील दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई-ठाण्यातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला.
परंतु, हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घरांना मालमत्ता करातून मुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं