गणेशोत्सवा निमित्त कोकणवासीयांसाठी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या मार्फत मोफत बस सेवा

मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी गणेश उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच. परंतु अंधेरी पूर्वेकडील त्याच कोकणवासीयांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अंधेरी पूर्व येथील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांच्या ‘जीवन ज्योत प्रतिष्ठान’ तर्फे कोकणच्या चाकरमान्यांची ही अडचण लक्षात घेऊन कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, कणकवली आणि देवगडला जाणाऱ्या तब्बल ३५ पेक्षा अधिक खासगी बसेस मोफत रवाना करण्यात आल्या आहेत.
सध्या कोकणात जाणाऱ्या खासगी बस सेवांचे दर गगनाला भिडले असल्याने कोकणवासीयांसाठी, नगरसेवक मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठान तर्फे दिली गेलेली ही मोफत बस सेवा दिलासा देणारी ठरली आहे. अंधेरी पूर्वेला मोठ्या प्रमाणावर कोकणातील लोकं वास्तव्यास असून भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल गणपतीच्या उत्सवात ही मोफत बस सेवा दरवर्षी पुरवतात.
नगरसेवक मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वेला त्यांच्या प्रभागात महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामांसोबतच, जीवन ज्योत प्रतिष्ठान या त्यांच्या सेवाभावी संस्थेमार्फत अनेक समाज सेवेची कामं नित्याने करत असतात. त्यांमुळे सर्वच थरातील लोकं त्यांच्याशी व्यक्तिगत स्वरूपात जोडले गेले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं