बॅलेट पेपरने झालेल्या कारगिल स्थानिक निवडणुकीत भाजपला १ जागा तर काँग्रेस व नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीची सरशी

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीर मधील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कारगिल येथील पहाडी विकास परिषदेच्या २६ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीने सरशी मारली आहे, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
विशेष म्हणजे ही संपूर्ण निवडणूक बॅलेट पेपरने पार पडली होती. निवडणुकीतील एकूण निकालात नॅशनल कॉन्फ्रेस पार्टीने सर्वाधिक म्हणजे एकूण १० जागा जिंकत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस एकूण ७ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पीडीपी’ला २ तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे ५ जागांवर केवळ अपक्ष विजयी झाले आहेत.
एकूणच बॅलेट पेपरने पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपची अवस्था अपक्षांपेक्षा सुद्धा बिकट झाली आहे. या निवडणुकीत एकूण ७० टक्के मतदानाची नोंद झाली होती आणि एकूण ९९ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी अंती फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फ्रेस पार्टीने पदुम, तेसोरू, पोएन, सिलमो, थांगसम, परकाचिक, कारगिल टाऊन आणि चुली सिंबु या १० जागांवर विजय संपादन केला आहे. तर काँग्रेसने पशकुम, भीमभाट, चोसकोर, खांग्रल, शकर, बारू, खारशह या ७ जागांवर विजयश्री संपादन केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं