बिहारमध्ये भाजप-जनता दल (युनाइटेड) १७-१७ तर पासवान यांना ६ जागा

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राजकीय घटनांनी जोर धरला आहे. त्यानिमित्त बिहारमध्ये सुद्धा एनडीए’दरम्यानचे जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जागावाटपावर आज दिल्लीत या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि जागावाटप निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू (युनायटेड) पक्षाला प्रत्येकी १७ जागा मिळाल्या आहेत तर, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला ६ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यासोबतच रामविलास पासवान यांना थेट भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय अमित शहांनी जाहीर केला. त्यामुळे रामविलास पासवान यांना लोकसभेच्या तोंडावर एनडीए’मध्ये थोपविण्यात यश आले आहे. काही दिवसांपासून ते नाराज असल्याचे वृत्त होते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आधी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार तसेच बिहार भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव दाखल झाले. त्यानंतर काही वेळात लोजपा सुप्रिमो रामविलास पासवान आणि त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान दाखल झाले. यानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषदेत बिहारमधील लोकसभेच्या जागा वाटपाची घोषणा करण्यात आली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं