#BreakingNews - भाजप डोंबिवली शहर उपाध्यक्षाच्या दुकानातून १७० प्राणघातक शस्त्रे जप्त

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने तब्बल १७० प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे. धनंजय कुलकर्णी या भाजप कार्यकर्त्यांचं वय वय ४९ वर्षे असून, त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत या बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस नावाने त्याचे दुकान आहे. सदर दुकान हे भारतीय जनता पक्षाचा स्थानिक पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या मालकीचे आहे. धनंजय कुलकर्णी हा भाजपचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष पदावर होता. त्याच्या दुकानात प्राणघातक शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून इथून मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याचे वृत्त आहे. या हत्यारांची बाजारातील किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी आहे. धक्कादायक म्हणजे जप्त करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये पिस्तूलचा देखील समावेश आहे. त्यामुळे भाजपाची मोठी राजकीय कोंडी झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं