मुलीच्या विनयभंगाच गांभीर्य नाही, सेनेला भाजपची मैत्री महत्वाची? भाजपचा उल्लेख टाळून मनसेवर पूर्ण बातमी

मुंबई : काल भाजपचे विक्रोळीचे नेते आणि महापालिकेचे नगरसेवक पदाचे उमेदवार मंगेश सांगळे यांनी चालू गाडीमध्ये एका परिचयातील १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार ऐरोलीमध्ये घडला आहे. सदर प्रकरणी रबाळे पोलिसांनी सांगळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून ते पुढील तपास करीत आहेत.
३-४ वर्षांपूर्वीच भाजपमध्ये गेलेले मंगेश सांगळे हे ऐरोलीमधील ‘यश पॅराडाइझ’ या सोसायटीमध्ये राहतात. याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाबरोबर त्यांचे घरगुती संबंध होते. त्याचाच गैरफायदा घेऊन सांगळे यांनी याच कुटुंबातील एका १९ वर्षीय तरुणीचा धावत्या गाडीत विनयभंग केला; मात्र तिने मोठय़ा शिताफीने सांगळे यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. हा प्रकार या तरुणीच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी रबाळे पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सांगळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, याप्रकरणी सांगळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता न्यायालयाने येत्या 28 मार्चपर्यंत त्यांना तात्पुरता जामीन दिला आहे. परंतु, विषयाचे गांभीर्य समजून घेण्यापेक्षा शिवसेनेने इथेही भाजपशी मैत्री जपल्याचे पाहायला मिळते. संपूर्ण बातमी देताना ते भाजपचे पदाधिकारी असल्याचा उल्लख देखील टाळत, संपूर्ण बातमी मनसेच्या नावाने प्रसिद्ध करून ती समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येते आहे. संबंधित पदाधिकारी हा आपल्या मित्र पक्षाचा पदाधिकारी असल्याचे पूर्णपणे लपवून केवळ जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचा केविलवाणा प्रकार स्वतःच्या वर्तमान पत्रातून केल्यामुळे शिवसेनेवर रोष व्यक्त करण्यात येत असून, त्या मुलीपेक्षा शिवसेना भाजपचा मैत्रीपूर्ण धर्म जपत असल्याचा आरोप समाज माध्यमांवर केला जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं