भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात आणि फोटोसेशन

उल्हासनगर : याआधी दलितांची तुलना डुकरासोबत करणारे भाजपचे विवादित आमदार तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पुन्हा त्यांच्या अशाच विवादित कृत्यामुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि समाज माध्यमांवर त्यांच्या विरुद्ध संतापाची लाट आली आहे. यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटोशूट केले आहेत.
भाजपची अनेक नेते मंडळी आणि आमदार तसेच मंत्री रोज कोणत्या तरी विवादित मुद्यात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतःला वारकरी असल्याचे सांगणारे आमदार राम कदम यांनी तुम्हाला एखादी मुलगी पसंत असल्यास आणि मुलाच्या घरातील पालकांना ती आवडल्यास त्या मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार असं विकृत वक्तव्य केलं होत. त्यानंतर राम कदम आणि भाजपवर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला होता.
आता उल्हासनगर महानगरपालिकेत नवीन महापौर बिनविरोध निवडून आल्याने ते उल्हासनगर मध्ये आले असता, त्यांनी महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटोशूट केल्याचे समोर आलं आहे. ज्या रयतेच्या राज्याच्या नावाने प्रचार करून मतं घेतली त्यांची प्रतारणा अजून किती वेळा सत्ताधारी करणार, असा प्रश्न सामान्य उपस्थित करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं