मुंबई दादर'मध्ये येताच भाजपचे प्रवक्ते संबित पात्रां'च्या पायातले शूज हातात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आज मुंबईमध्ये आहेत. मुंबईमधील पावसाने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रां’वर नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्याची वेळ आली आहे. परंतु पत्रकार परिषद रद्द झाल्यावर बाहेर पडलेल्या संबित पात्रांना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे चालणे कदाचित इतके अवघड होऊन बसले की त्यांना पायातले शूज हातात घेऊन रस्ता शोधण्याची वेळ आली.
त्यांच्याबरोबर भाजपचे राज्यातील प्रवक्ते केशव उपाध्ये हे सुद्धा पाण्यातून वाट काढत होते. नेहमी पत्रकार परिषदेत विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे हे प्रवक्ते आज मात्र निसर्गापुढे हतबल होऊन शांत पणे वाट काढताना दिसले. पण या अनुभवातून भाजप मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत किती भक्कम पायाभूत सुविधा मुंबईकरांना पुरवत आहे याचा त्यांना प्रत्यय आला असावा.
या पुढे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्र हे त्यांचा मुंबईतील पावसाच्या सफारीचा अनुभव एखाद्या पत्रकार परिषदेत नक्कीच इतरांना सांगतील यात काहीच शंका नाही. भाजप मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत भागीदार असल्यामुळे, त्यांनी जर हा अनुभव ट्विटर’वर शेअर केल्यास त्यांना संपूर्ण शहर ट्रोल करेल यात काहीच शंका नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं