बलाढ्य अर्थशक्ती? भाजपकडून प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर बुक?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशी राजकीय पक्षांची सुद्धा धावपळ सुरु झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून विरोधकांची वेगळ्याच प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. कारण, काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीआधीच विरोधकांची राजकीय कोंडी करण्यासाठी अर्थकरणाच्या शक्तीवर देशातील जवळपास सर्वच खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर आधीच बुक केले आहेत.
तसेच त्यांनी हे सुद्धा पुढे स्पष्ट केलं की, ‘सत्ताधारी भाजप जरी अर्थकारणाच्या जीवावर राजकीय प्रचार सामुग्रीत आमच्या वरचढ असली, तरी आगामी लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकणार’ असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातून आलेल्या या बातमीने भाजप किती झपाट्याने कामाला लागली आहे याचा प्रत्यय येतो.
आचारसंहिता लागण्याच्या आधी रोज नवनवीन घोषणा करणे सुरु आहे. तसेच विरोधकांची प्रचारादरम्यान राजकीय कोडी करण्यासाठी भाजप निरनिराळे हतखंडे वापरत असल्याचं समोर येते आहे. त्यातील एक भाग म्हणजे देशभरात आधीच निवडक खासगी चार्टर्ड प्लेन व हेलिकॉप्टर सेवा पुरविणारे असताना, ते सुद्धा आधीच बुक करून विरोधकांना कोंडीत पकडले आहे. तसेच यापुढे कदाचित भाजप देशभरातील प्रचार सभा आयोजित करण्यासाठी लागणारी भव्य पटांगण – मैदाने बुक करण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं