कोलकाता तापलं! अमित शहांची रॅलीपूर्वी भाजपच्या बसेस फोडल्या : ANI

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आज कोलकाता येथील माया रोड येथे युवा समावेश रॅलीला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. परंतु त्यापूर्वीच स्थानिक राजकारण पेटलं असून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर बरोबरच भाजप समर्थकांच्या गाडीच्या काचाही तृणमूलच्या आक्रमक कार्यकर्त्यांकडून फोडण्यात येत आहेत.
तृणमूलने पोस्टर्सवर ‘बंगालविरोधी भाजप चले जाव’, असे नारे लिहून अमित शहांच्या रॅलीपूर्वी वातावरण तापवलं आहे. त्यातूनच चंद्रकोना येथील भाजप समर्थकांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. कोलकाता येथील भाजपचे अमिताभ राय यांनी पोस्टरबाजी तसेच तृणमूलच्या झेंड्यांवरुन त्यांना लक्ष्य केले आहे.
एनआरसीच्या मुद्द्यावरुन आसाम मधील राजकीय वातावरण तापले असताना भाजप त्याच मुद्याचं राजकारण कोलकाता येथे करून राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहंच्या रॅलीला पश्चिम बंगालमध्ये जोरदार विरोध करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळेच भाजपचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा असून त्यातील २२ जागांवर विजय मिळवण्याचे भाजपने ध्येय ठेवले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं