अमित शहांची लवकरच पुणे, बारामती, मावळ व शिरूर मतदारसंघासाठी आढावा बैठक

पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुढील आठवड्यात पुणे दौ-यावर येत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ते पुणे, बारामती, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. तसेच संबंधित मतदारसंघातील बुथ प्रमुखांना ते मार्गदर्शन सुद्धा करणार असल्याचे समजते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खूप कमी वेळ उरला असताना भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या एप्रिल महिन्यात निवडणुका अपेक्षित असल्याने सर्व पक्षांकडे जेमतेम २ महिने उरले आहेत. दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजे मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक अयोग आचारसंहिता लागू जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच पक्ष आणि आघाड्या जोरदार कामाला लागल्या आहेत.
विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात होणारे नुकसान भाजप महाराष्ट्रातून भरून काढण्याची रणनिती आखात असल्याचे समजते. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने २४ पैकी २३ जागांवर विजय संपादन केला होता. तसं असलं तरी सध्या परिस्थिती बदलली आहे याची भाजपला जाणीव झाल्याने ते कोणताही धोका पत्करण्याची मनस्थितीत नाहीत असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून भाजप एकप्रकारे शिवसेनेला राजी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. त्यामुळे अमित शहा सर्व मतदारसंघातील स्थिती जाणून घेत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं