भाजपने आता तेलंगणावर लक्ष वळवले

नवी दिल्ली : दक्षिणेत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सत्तास्थापनेला अपयश आल्याने आता भाजपने आता दक्षिणेतील दुसरं राज्य तेलंगणावर लक्ष केंद्रित केलं आहे. तेलंगणा विधानसभेत एकूण १२० जागा असून सध्या भाजपचं तेथे एकूण संख्याबळ केवळ ५ आमदार इतकंच आहे. परंतु तेलंगणात परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गुजरात मॉडेल अंमलात आणण्याचा विचार आहे.
तेलंगणात पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रच होणार असल्याने इथे पक्ष मजबुतीवर आत्तापासूनच जोर दिला जाणार असल्याची माहिती भाजप तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण यांनी प्रसार माध्यमांना दिली असून अमित शहा यांनी सुद्धा तसे संकेत त्याचा पत्रकार परिषदेत दिले आहेत. सध्या तेलंगणात टीआरएसचे एकूण ९१ आमदार असून काँग्रेसचे १३ आमदार आहेत तर भाजपचे केवळ ५ आमदार इतकं संख्याबळ आहे.
भाजप तेलंगणा बरोबरच आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशावर सुद्धा लक्ष केंद्रित करणार आहेत. विशेष म्हणजे भाजप संघटना मजबूत करण्यासाठी आणि राज्यांत चांगलं यश मिळण्यासाठी ‘पान प्रमुख’ हे निवडणूक यशाचं मॉडेल अंमलात आणणार आहे. कारण त्यात भाजपला अनेक राज्यात मोठं यश मिळालं आहे. या मॉडेल नुसार पक्ष एका मतदार यादीतील एक पानासाठी एक प्रमुख नेमतो. त्या पानासंबंधित तो प्रमुख त्याच पानावर नावाप्रमाणे आणि पत्याप्रमाणे उपलब्ध मतदाराच्या नेहमी संपर्कात राहतो ज्याचा फायदा त्यांना थेट मतदानादिवशी होतो.
सध्या तेलंगणात ११९ विधानसभा मतदारसंघातील ४० – ५० मतदारसंघात एकूण पान प्रमुख नेमण्याचे काम झाले आहे असं लक्ष्मण म्हणाले. उर्वरित मतदारसंघावर सुद्धा पक्ष संपूर्ण काम लवकरच पूर्ण करेल असा आशावाद त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं