भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांना २४ लाखांचा दंड, न्यायालयात माफीनामा देण्याची वेळ

मुंबई : अंधेरी पूर्व येथील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांना मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. अंधेरी पूर्व येथे बेकायदा होर्डिंग लावल्या प्रकरणी तसेच पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणी न्यायालयाने ही कडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ही मुंबई पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.
भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांना त्यांच्या वॉर्डमध्ये बेकायदा होर्डिंग्स लावल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सदर प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आपला बिनशर्त माफीनामा देखील न्यायालयाकडे सादर केला आहे आणि यापुढे एकही बेकायदेशीर होर्डिंग लावणार नाही अशी लेखी हमी सुद्धा हायकोर्टात दिली आहे.
त्यात भर म्हणजे आठवड्यातला एक दिवस स्वतःच्या वॉर्डमध्ये फिरून शाळा, मैदान आणि हॉस्पिटल सारख्या परिसरात फिरून कोणतेही बेकायदा होर्डिंग शोधून त्याची नियमानुसार तक्रार सुद्धा स्वतः मुरजी पटेल यांनाच करावी लागणार आहे. तसेच २ महिन्यांनी मुंबई पालिकेला केलेली नुकसानभरपाई आणि बेकायदेशीर होर्डिंग्सच्या किती तक्रारी केल्या त्याचा संपूर्ण तपशील आणि माहिती देखील द्यावी लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं