प्रसार माध्यमांच्या प्रचारामुळे मोदी पंतप्रधान झाले', त्यांनी कधीही चहा विकला नव्हता

तिरुवअनंतपुरम : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तिखट शब्दात टीका केली आहे. भाजपमध्ये मी सध्या वैयक्तिकरित्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदींनी भूतकाळात केव्हाही चहा विकलेला नसून ते केवळ प्रसार माध्यमांच्या प्रचारामुळेच देशाचे पंतप्रधान झाले आहेत अशी बोचरी त्यांनी थेट मोदींचं नाव घेऊन केली आहे.
काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या ‘दी पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन काल तिरुवनंतपुरम या ठिकाणी करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शत्रुघ्न सिन्हांनी हे भाष्य केले. दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मला अनेक लोकं विचारतात की तुम्ही चित्रपट क्षेत्रातील कलाकार आहात, तुम्हाला नोटाबंदी आणि जीएसटीमधल्या विषयात काय समजतं? जर एखादा वकील अनुभव नसताना आर्थिक मुद्द्यांवर बोलतो, टीव्हीवरची एक कलाकार केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री होते, एक चहा विकणारा माणूस… अर्थात मोदींनी केव्हाही चहा विकलाच नाही. ते केवळ मीडिया प्रचारावर पंतप्रधान झाले. आणि ते जर काहीही बोलू शकतात तर मी नोटाबंदी किंवा जीएसटी या मुद्द्यांवर का बोलू शकत नाही?’ असा थेट प्रश्न शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित केला.
पुढे ते असं ही म्हणाले की, ‘माझे काही नरेंद्र मोदींशी व्यक्तीगत शत्रुत्त्व नाही. मात्र वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीला मी कंटाळलो आहे’ असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तिखट शब्दांमध्ये निशाणा साधला. दरम्यान, याच कार्यक्रमात शशी थरुर यांनी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रणच दिले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं