केंद्राकडून पूरग्रस्त केरळसाठी ५०० कोटींची मदत जाहीर

तिरुवनंतपुरम : केरळच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० कोटी रुपयांची आपत्कालीन मदत जाहीर केली आहे. केरळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे.
त्यानंतर मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राकडून ५०० कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी केंद्राकडून १०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती आणि त्यात आता ५०० कोटी अतिरिक्त देण्यात येणार आहेत.
त्याशिवाय पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. केंद्राकडून ६०० कोटीची एकूण मदत जाहीर करण्यात आली असली तरी केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने टि्वट करून माहिती दिली की पंतप्रधानांकडे २००० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५०० कोटी रुपये मदतीची घोषणा मोदींनी केलीआहे. केरळच एकूण १९,५१२ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना दिली आहे. त्यामुळे वास्तविक जास्त मदतीची गरज असल्याचं विजयन यांनी सूचित केलं आहे.
मोदींनी मुख्यमंत्री विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फॉन्स आणि अन्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने टि्वट करून माहिती दिली की पंतप्रधानांकडे २ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५०० कोटी रुपये मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली. राज्याचे १९ हजार ५१२ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी मोदींना दिली. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं