गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी पराभूत होणार: प्रकाश आंबेडकर

नागपूर : नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणारे नितीन गडकरी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी दोनशे कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा थेट दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अॅड. आंबेडकरांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी हा दावा केला. यावेळी त्यांनी युती व आघाडीच्या भूमिकेवर चौफेर टीकास्त्र सोडले. नितीन गडकरींचा पराभव अटळ असल्याचा दावा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आदिवासी, हलबा, मुस्लीम, बौद्ध आदी भाजपच्या विरोधात आहेत. आदिवासींवर अन्याय झाला. त्यामुळे नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं