मराठा आरक्षणसाठी आज पुण्यात चक्काजाम

पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यभर हिंसाचार सुरु झाल्यावर राज्य सरकार खडबडून जाग झालं असलं तरी मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलन आणि चक्काजाम थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज मराठा आरक्षणसाठी पुण्यात चक्काजाम करण्यात आल्याने अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता.
या वेळी आंदोलकांनी विविध विषयांना हात घालत त्यांच्या मागण्या प्रसार माध्यमांकडे व्यक्त करताना म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलक करताना दिसत होते.
तसेच डेक्कन जिमखान्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला आंदोलकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर जिजाऊ वंदनेने मोर्चाला प्रारंभ झाला. या आंदोलनादरम्यान औरंगाबाद यथे मृत्यू पावलेल्या काकासाहेब शिंदे यांनाही यावेळी आंदोलकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं