आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मुंबई : आज मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणावर तोडगा याच मूळ चर्चेचा विषय असणार आहे असं वृत्त आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्व पक्षाच्या प्रतिनिधींची भूमिका समजून घेतली जाणार आहे. तसेच मराठा वर सर्वबाजुंचा विचार करून काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर विचारमंथन होणार आहे. वास्तविक मराठा आरक्षणावरून जेव्हा पुन्हा रान उठलं आणि आक्रमक आंदोलनामुळे काकासाहेब शिंदे या तरुणाचा हाकनाक बळी गेल्यावर आंदोलन अजूनच उग्र झालं आहे. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागताच सरकार खडबडून जाग झाल्याचं चित्र आहे.
त्यामुळे या आंदोलन अजून दाहक होण्यापूर्वीच ते थोपविण्यासाठी लवकरात लवकर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. आज विधान भवनात ही बैठक दुपारी २ वाजता आयोजित होणार असल्याचं वृत्त आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा यासाठीही हालचालींना वेग आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं