प्रकाश आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे? पृथ्वीराज चव्हाण

पुणे : बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस पहिल्यापासून तयार आहे. परंतु ते आमच्या प्रस्तावावर टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे हेच अद्याप समजत नाही, असा आरोप काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चव्हाण शुक्रवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँंग्रेस पक्ष देशभरात निरनिराळ्या पक्षांशी आघाडी करीत आहे. राज्यातसुद्धा छोट्या-मोठ्या पक्षांबरोबर आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीला मिळू नये, हा या मागचा प्रमुख उद्देश आहे.
२०१४ ची लोकसभा निवडणूक आम्ही वेगवेगळी लढल्याने आमचे नुकसान झाले होते. यावेळी ते टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्यानेच आंबेडकरांना सहभागी करुन घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत. पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. आम्ही केव्हाही चर्चेला तयार आहोत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं