राहुल गांधींनी घेतली पर्रिकरांची सदीच्छा भेट, केली तब्येतीची विचारपूस

पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री आणि पूर्व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची सदीच्छा भेट घेतली. राहुल गांधी हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत गोव्यामध्ये सुट्यांसाठी आले आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनौपचारिक स्वरुपाची होती, अशी माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी केवळ मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या हेतूने सदर भेट घेतल्याचे वृत्त आहे.
मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. त्यानिमित्ताने काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असे सांगण्यात आले आहे. मध्यंतरी राफेल लढाऊ विमानांच्या कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पर्रिकरांकडे महत्वपूर्ण माहिती असल्याचे आरोप केले होते. पर्रिकरांकडे संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार त्यावेळी असल्याने या कराराची संपूर्ण माहिती मनोहर पर्रिकरांना असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले होते.
परंतु, अचानक अशा भेटीच्या बातम्या आल्याने, सगळेच आश्चर्यचकित झाले होते. परंतु, केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी त्यांची भेट घेतल्याचे कळविण्यात आले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं