राफेल डील: राहुल गांधींची 'जॉईंट पार्लीमेंट्री कमेटी'ची मागणी अजून मान्य नाही?

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरून चौकशी करण्याची गरज नसल्याचे निकालात स्पष्ट करताच अमित शाहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींवर राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी देशाची माफी मागावी अशी जाहीर मागणी करावी.
त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून अखेर सत्याचा विजय झाला आहे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केवळ काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठीच राफेलवरून राजकारण केल्याचा थेट आरोप सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी केला आहे. परंतु वास्तविक सुप्रीम कोर्टात या विषयावरून याचिका ही आपचे नेते आणि विधितज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी दाखल केली होती. या याचिकेशी काँग्रेसचा काही संबंध नव्हता. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी JPC म्हणजे ‘जॉईंट पार्लीमेंट्री कमेटी’ची मागणी केली होती. परंतु भाजपने आजही ती मागणी मान्य केलेली नाही.
सर्व पक्षीय ‘जॉईंट पार्लीमेंट्री कमेटी’ स्थापन करण्याची मागणी भाजपने मान्य केलेली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाने प्रफुल्लित झालेल्या भाजप कडून राहुल गांधींची सर्व पक्षीय सदस्यांची ‘जॉईंट पार्लीमेंट्री कमेटी’ची मागणी मान्य होणार का ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं