राफेल लढाऊ विमानाची किंमत सांगा आणि ५ कोटी जिंका; बिहारमध्ये सर्वत्र पोस्टर्स

पाटणा : काँग्रेस राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून भाजपला आणि मोदींना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. फ्रान्स मधील प्रसार माध्यमांनी या करारावर आणि विशेष करून अनिल अंबानींच्या कंपनीवर संशय व्यक्त केल्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात आता इतर राज्यातील स्थानिक नेत्यांनी सुद्धा राफेल लढाऊ विमानांच्या किमतींवरून मोदींच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे.
त्याचाच भाग म्हणजे बिहार मधील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी पाटणा शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये कलगीतुरा सुरु झाला आहे. पाटण्यात लावण्यात आलेल्या पोस्टरध्ये मोदींच्या सत्ताकाळात तयार करण्यात आलेल्या ३५ विमानतळांची नावे आणि राफेलची किंमत सांगणाऱ्या व्यक्तीला तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते सिद्धार्थ क्षत्रिय आणि व्यंकटेश रमन यांच्या नावे शहरातील प्रमुख मुख्य चौकांमध्ये हे पोस्टर्स लावले आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या या पोस्टरबाजीमुळे भाजपने सुद्धा संताप व्यक्त करत उत्तर दिले आहे. भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, पोस्टरमध्ये देण्यात आलेले बक्षिस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच जिंकतील. तसेच, कोणतेही ठोस कारण नसताना राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात मोदींना, भाजप आणि केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्ष जाणूनबुजून ओढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं