ESIC इस्पितळ जळीत प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांना मुरजी पटेल यांच्या हस्ते मदत सुपूर्द

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई अंधेरी पूर्व येथे असलेल्या इएसआयसी इस्पितळाला प्रचंड मोठी आग लागल्याने अनेकांनी जीव गमावला होता. त्यानंतर संबंधित विषयाला अनुसरून आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता सरकाकडून ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी पुढे येत होती. दरम्यान, स्थानिक नगरसेवक मुरजी पटेल यांनी त्यांची राजकीय शक्ती पणाला लावत केंद्राकडून ताबडतोब मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केली होता.
इएसआयसी इस्पितळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने राज्यसरकारने हा विषय केंद्राकडे वर्ग केला होता. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक मुरजी पटेल यांनी यासाठी राज्य आणि केंद्रामध्ये राजकीय जोर लावला आणि अखेर केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली आहे.
मरोळ अंधेरी पूर्व येथे आयोजित एका कार्यक्रमात मृतांना श्रद्धांजली वाहून, मृतांच्या संबंधित कुटुंबीयांकडे नगरसेवक मुरजी पटेल यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले. दरम्यान यावेळी संबंधित खात्याचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. वातावरण काहीसे शोकाकुल असले तरी सरकारने मदत केल्याने मृतांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या सर्व उपस्थित नातेवाईकांनी भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांचे विशेष आभार मानले. स्वतः जीवन ज्योत प्रतिष्ठान मार्फत स्थानिक लोकांशी जोडले गेलेले नगरसेवक मुरजी पटेल हे नेहमीच मतदारसंघातील समाज कार्यासाठी पुढाकार घेत असतात, असं उपस्थित स्थानिक लोंकांनी प्रसार माध्यमांकडे मत व्यक्त केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं