२०१४ मध्ये गंभीरने जेटलींचा प्रचार केला आणि ते पराभूत झाले, आता तो भाजपचा प्रचार करणार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने आमच्या पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचं यावेळी गौतम गंभीरने सांगितलं. देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल यावेळी गौतम गंभीरने भाजपाचे आभार मानले. गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासंबंधी बोलण्यास यावेळी अरुण जेटली यांनी नकार दिला. तिकीट देण्यासंबंधीचा निर्णय निवडणूक समितीवर सोडून देऊयात. गौतम गंभीर यांना योग्य ती जबाबदारी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत असून काही मोठे बदल केले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. गौतम गंभीरचा प्रवेश त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं