पक्षाध्यक्षांचे फेसबुकवर विडंबन, शिवसैनिक आक्रमक, नेटकऱ्यांनी 'त्या' विडंबनची आठवण करून देत झापलं

कळंबोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर केलेले विडंबन कळंबोली वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तशीही समाज माध्यमांवर वरचेवर जवळपास सर्वच नेत्यांची विडंबन असणारी चित्रं रोजच्या रोज दिसत असतात. तसेच काहीसे एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने केवळ ते फेसबुकवर शेअर केले. परिणामी सकाळी ११:३० वाजता व्हायरल केलेली ती पोस्ट शिवसैनिकांच्या चांगलीच वर्मी लागली. परिणामी रात्री ७ च्या नंतर तरुणाच्या घरापर्यंत शिवसैनिक मोठ्या संख्येने पोहोचले.
शिवसैनिक संबंधित तरुणाच्या घरावर जमताच त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. संपूर्ण प्रकार सोशल मीडियामार्फत पसरताच अजून शिवसैनिक तरुणाच्या घरी जमले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार हे पाहून कोणीतरी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिस रात्री १०:३० वाजता संबंधित तरुणाला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर अनेक शिवसैनिकांनी त्याला जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. तसेच अनेक महिला शिवसैनिकांनी या तरुणाला साडी देण्याचा हट्ट लावून धरला.
अखेर स्थानिक पोलिसांच्या कार्यालयातूनच या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून लाईव्हवर सर्व शिवसैनिकांची जाहीर माफी मागितली आणि प्रकरण मिटवले. वास्तविक ते चित्र त्या तरुणाने शेअर केले होते, ना की स्वतः ते रेखाटून प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सदर घटनेची कोणतेही नोंद स्थानिक पोलिसांनी केलेली नाही. सदर प्रकरणात परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी संबंधित तरुणाला बुधवारी सकाळ पर्यंत पोलिस चौकीतच ठेवले होते.
परंतु विडंबन झाल्याने शिवसैनिक आक्रमक झालेल्या आणि आता त्यांच्या विरुद्ध नेटकरी आणि मराठा समाजाचे नेटकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. जेव्हा मराठा समाजाचे तरुण-तरुणी आरक्षणासाठी ‘मूक-मोर्चा’ काढणार होते तेव्हा सामनात मराठा समाजाचं विडंबन करणारं “मुका-मोर्चा” नावाने व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यामध्ये आंदोलक तरुण तरुणी एकमेकांचे चुंबन घेताना दाखविण्यात आले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच मुद्याला अनुसरून शिवसेनेला चांगलेच झापल्याचे दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं