शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावले

मुंबई : शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून आमदार काते थोडक्यात बचावले आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षारक्षका सहित अन्य २ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबई मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मेट्रो-३च्या कारशेड परिसरात ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
उपलब्ध माहिती नुसार महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडचे काम सुरू आहे. मात्र दिवस-रात्र चालणाऱ्या मेट्रोच्या नॉनस्टॉप कामामुळे स्थानिक रहिवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तसेच रात्रीची झोप मिळणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यानिमित्त २ दिवसांपूर्वी मेट्रोचे काम थांबवण्यासाठी आमदार काते यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात काम थांबवण्यात आले होते. परंतु, आज पुन्हा मेट्रो परिसरात ट्रकची ये जा सुरू असल्याने काते आणि शिवसैनिकांनी तिथे जाऊन काम पुन्हा बंद पाडले.
दरम्यान, तेथून परतत असतानाच काते यांच्यावर तलावारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यातून काते थोडक्यात बचावले असले तरी त्यांचे सुरक्षारक्षक आणि अन्य २ सहकारी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मेट्रोच्या कंत्राटदारांनेच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आमदार काते यांनी केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी हा अप्रत्यक्ष स्थानिक लोकांना दम भरण्याचा प्रयत्नं असल्याचं समजतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं