राजीव गांधींच्या ‘भारतरत्न’वरुन आपमध्ये फूट? आमदार अलका लांबा नाराज?

नवी दिल्ली : दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीचा ठपका ठेवत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारने परत घेण्याच्या ठरावावरुन आपमध्ये वादंग निर्माण झालं आहे. कारण दिल्ली विधानसभेत सदर विषयाला अनुसरून थेट ठराव मांडण्यात आल्यानंतर आपच्या विद्यमान आमदार अलका लांबा यांनी समाज माध्यमांवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पक्षातील मतभेद सार्वजनिक केल्याने पक्षनेतृत्वाने अलका लांबा यांना थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता अलका लांबा काय आक्रमक पवित्रा घेणार ते पाहावं लागणार आहे. तसेच दिल्ली विधानसभेतील या ठरावावरुन वाद निर्माण झाला आहे. चांदनी चौकमधून निवडून आलेल्या आपच्या आमदार अलका लांबा यांनी या ठरावाला उघड विरोध दर्शवत पक्षाच्या भूमिकेशी असहमती दर्शवली होती.
काय ट्विट केलं आहे आमदार अलका लांबा यांनी?
आज @DelhiAssembly में प्रस्ताव लाया गया की पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय श्री राजीव गांधी जी को दिया गया भारत रत्न वापस लिया जाना चाहिये,
मुझे मेरे भाषण में इसका समर्थन करने को कहा गया,जो मुझे मंजूर नही था,मैंने सदन से वॉक आउट किया।
अब इसकी जो सज़ा मिलेगी,मैं उसके लिये तैयार हूँ। pic.twitter.com/ykZ54XJSAv— Alka Lamba (@LambaAlka) December 21, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं