मुख्यमंत्री नक्की 'लांडगे' असं कोणाला म्हणाले ?

मुंबई : आज मुंबई मधील भाजप पक्षाच्या वर्धापन दिनानिम्मित आयोजित महामेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस भाषणा दरम्यान नक्की लांडगे कोणाला म्हणाले, एनडीएतून बाहेर पडून किंव्हा भाजपशी युती तोडून नंतर यूपीएतील घटक पक्षांच्या नेत्याची भेट घेणाऱ्या जुन्या मित्रपक्षांना की केवळ यूपीएतील जुन्या मित्र पक्षांना ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
यूपीएतील घटक पक्ष आजही एकत्र आहेत आणि आधीही एकत्र होते. एडीएतील आरपीआय (आठवले गट) आणि रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी हे दोन पक्ष ज्याची सत्ता असते तिथे जाऊन मिळतात. त्यामळे यूपीएतील सर्व जुने घटक पक्ष एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतील तर त्यात गैर काहीच नाही.
परंतु उलटपक्षी काही दिवसांपासूनचे निरीक्षण केल्यास दिसून येईल कि, एनडीएतून बाहेर पडलेले टीडीपीचे सर्वेसेवा चंद्राबाबू नायडू यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. तसेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख स्वतः मुंबईत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये व्यक्तिशः भेटले होते. त्यानंतर स्वतः संजय राऊत हे पुन्हा ममता बॅनर्जी यांना दिल्लीत भेटले होते आणि त्याची अधिकृत माहिती सुद्धा ट्विटरवरून दिली होती.
मुळात यूपीएतील जुने घटक पक्ष आजही एकत्र आहेत आणि ते जर भविष्यातील निवडणुकांचा वेध घेत एकत्र येत असतील तर त्यात वावगं असं काहीच नाही. परंतु उलटपक्षी असा विचार केला तर एनडीएचे जुने पक्षच यूपीएतील घटक पक्ष असलेल्या नेत्यांच्या गाठी भेटी घेण्यात व्यस्त आहेत.
मग मुख्यमंत्री भाषणात असे का म्हणाले की, सत्तेसाठी सर्व ‘लांडगे’ एकत्र येत आहेत. नक्की मुख्यमंत्री कोणाला लांडगे म्हणाले ?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं