मोदी जे कधीच मान्य करत नाहीत ते 'अटल बिहारी वाजपेयीनीं' मान्य केलं होतं: व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ पासून काँग्रेसवर टीका करताना प्रत्येक भाषणात देशवासियांना एक विषय वारंवार ऐकवतात आणि तो म्हणजे या देशात ७० वर्षात देशात काहीच विकासाची कामं झाली नाहीत. काँग्रेसवर टीका करताना त्यांचा नेहमीच हा दावा असतो.
त्यांची टीका एवढ्यावरच थांबत नाही तर मोदी सरकारमध्ये अनेक नेते असं जाहीरपणे बोलू लागले आहेत की, काँग्रेसने जो विकास ७० वर्षात केला नाही तो आम्ही केवळ ४ वर्षात केला. एकूणच सध्या भाजपचे नेते उपभोगत असलेल्या सर्व सुविधा ह्या काँग्रेसच्या काळातीलच आहेत याची सुद्धा त्यांना जाणीव नाही.
परंतु एनडीएचे आणि भाजपचे आधीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी मात्र त्याच्या कार्यकाळात असं कधीही म्हणाले नाहीत की, काँग्रेसच्या राजवटीत ५० वर्षात देशात काहीच प्रगती झाली नाही. इतकच नाही तर ते पुढे असं सुद्धा मान्य करतात की, वस्तुस्तिथी न स्वीकारणे म्हणजे देशाच्या पुरुषार्थावर पाणी फिरविण्यासारख आहे. काँग्रेसने ५० वर्षात काहीच केलं नाही असं बोलणं म्हणजे शेतकऱ्यांवर, कामगारांवर आणि सामान्य भारतीयांवर अन्याय करण्यासारखं होईल असं ते प्रामाणिक पणे भर लोकसभेत मान्य करायचे.
भाजपच्याच दोन पंतप्रधानांच्या स्वभावातील आणि व्यक्तिमत्वातील प्रामाणिकपणा दाखवणारा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे.
काय म्हणाले होते अटल बिहारी वाजपेयी लोकसभेत, पहा सविस्तर
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं