उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या; आणि हॉटेल सिल झालं!

महाबळेश्वर, 25 डिसेंबर: झालं असं की उध्दव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय महाबळेश्वरला विश्रांतीसाठी गेले असता, शेजारीच असलेल्या हॉटेलमध्ये चालू असलेल्या वरातीतून होणाऱ्या आवाजाने त्यांना त्रास झाला आणि त्या हॉटेलला चक्क टाळं ठोकण्याचा भीम पराक्रम शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे. एन नाताळच्या हंगामातच हे घडल्याने हॉटेल मालकाला प्रचंड नुकसान होत आहे.
त्यांनी संपर्क करून त्या वरातीचा आवाज बंद करण्यास त्यांनी सांगितलं. मात्र ती वरात सुरूच राहिली. कारण विदर्भातील एका भाजप आमदाराच्या पुतण्याचा हा कौटुंबिक विवाह सोहळा होता आणि त्याच लग्नाची वरात संध्याकाळी निघाल्यावर, लग्नातील मंडळींनी आंनद साजरा करण्यासाठी डीजे लावून नाचण्यास सुरवात केली. त्याच डीजेच्या आवाजाने बाजूलाच वास्तव्यास असलेल्या ठाकरे कुटुंबियांना त्या डीजेच्या आवाजाचा त्रास झाला. अखेर साहेबांनी फर्मान काढले आणि आपल्या साहेबांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम कामाला लागले.
थेट मुंबईहुन महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आदेश गेले आणि लगेचच या अधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला आदेश दिले. परंतु विवाह सोहळ्याचा आनंद लुटणाऱ्या वऱ्हाडी मंडळी काही ऐकण्याच्या मनःस्थितीत न्हवती. अखेर सर्व सरकारी आदेश धुडकावत विदर्भातील वऱ्हाडी मंडळी थाटात लग्नं सोहळा साजरा करतच होती.
शेवटी पोलिस खात्यालाही फर्मान गेले, परंतु न्यायालयाचे आदेश असताना रात्री दहाच्या आधी कारवाई कशी करणार ? असा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गेल्याने पोलिस अधिकारीही काहीच करू शकले नाहीत. परंतु गृहखाते आणि पर्यावरणखाते यांच्यातील या शीत युध्दात पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर वाढत्या दबावाखाली येऊन वऱ्हाडी मंडळींवर ध्वनिप्रदूषणाची कारवाई करण्यात आली.
परंतु नंतर काही दिवसांनी उध्दव ठाकरे कुटुंबीय मुंबईत परतल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नेहमीच तत्पर असणाऱ्या खात्यातून पुन्हां सूत्र हलली. त्यानंतर थेट अधिवेशनाच्या पटलावरच महाबळेश्वर मधील मोठया गंभीर प्रश्नावर म्हणजे ‘ध्वनीप्रदूषणावर’ अतिशय गंभीर चर्च्या रामदास कदमांनी घडवून आणली. त्याचाच परिपाक म्हणून प्रदूषण मंडळाच्या तत्पर अधिकाऱ्यांनी त्या हॉटेलवर कारवाई करत, एका आलिशान हॉटेलला सील ठोकलं
हे सर्व इतक्यावरच थांबलं नाहीतर थेट महाबळेश्वर नगरपालिकेलाही रामदास कदम यांच्या कार्यालयातून आदेश गेले, आणि त्या हॉटेलचं नळ – विद्युत पुरवठा तोडण्यासाठी सर्व अधिकारी कामाला लागले. त्याचा फटका इथे वास्तव्यास असलेल्या ऊच्चभ्रू पर्यटकांनाही झाला आणि त्यांना हॉटेल सोडावं लागलं.
आणि हद्द म्हणजे मोठ्या साहेबांना त्रास झाला असल्याने, आधीचे महाबळेश्वर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनाही या हॉटेलचे बांधकाम बेकायदा असल्याचा दैवी साक्षात्कार झाला असून ते पाडण्यासाठी जोमाने हालचाली सुरु झाल्या आहेत.
मात्र घडल्या प्रकारावर हॉटेल प्रशासन काहीही बोलायला तयार नसून, प्रदूषण मंडळाच्या कारवाईने संपूर्ण हॉटेल व्यवस्थापन भेदरलं आहे कारण या हॉटेल चे सर्व सूट सील केल्याची खात्रीलायक माहिती आहे. हॉटेल मालक मात्र एन नाताळच्या हंगामातच कमालीचा तोट्यात गेला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं