मुंबई, पुणे आणि नाशिकचे डीजे मालक राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबई, पुणे आणि नाशिकच्या डीजे मालकांनी भेट घेतली. ऐन सणासुदीच्या काळातच बंदी घातली गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, त्यावर काही मार्ग निघण्याचा आशेने डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन अडचणी मांडल्या.
दरम्यान, चर्चेअंती डीजे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर येत्या १९ तारखेला सुनावणी होणार असल्याने १-२ दिवस वाट पाहावी. परंतु जर मंडळ तयार असतील तर डीजे नक्की वाजवा असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे तसेच डॉल्बी वाजविण्यावर बंदी आहे.
परंतु, साउंड सिस्टीमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं योग्य आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाला महाराष्ट्र सरकारला केला होता. त्यावर १९ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी गणेश मंडळांनी सुद्धा मनसे अध्यक्षांची भेट घेऊन अडचणी मांडल्या होत्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं