छगन भुजबळांना जीवे मारण्याचं धमकी पत्र

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आम्ही तुमचा सुद्धा दाभोलकर, पानसरे करु असे धमकी पत्र भुजबळांना आल्याची बातमी आहे. भुजबळांच्या नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, एनसीपीच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती दिली आहे.
तसेच आम्हाला मनुस्मृती नकोय तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हवं आहे, असे छगन भुजबळांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात विधान केले होते. तसेच, छगन भुजबळांनी अनेक वेळा मनुस्मृतीचा जाहीर निषेध नोंदवला आहे. दरम्यान, भुजबळांना धमकीचं पत्र मिळाल्याचं वृत्त पसरताच भुजबळ फार्मवर मोठ्या प्रमाणात एनसीपीचे कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या धमकी पत्राची लवकरात लवकर सखोल चौकशी व्हावी आणि सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी एनसीपीचे कार्यकर्ते करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं