अनिल परब यांना ईडीचे समन्स | २८ तारखेला राहावे लागणार हजर

मुंबई, २५ सप्टेंबर | ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना २८ तारखेला त्यांना हजर राहून जबाब नोंदविण्यासंदर्भातील समन्स पाठवण्यात आले आहे. पहिल्या समन्सला परब यांनी गैरहजर राहत मुदतवाढ मागून घेतली होती. आता दुसरे समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
अनिल परब यांना ईडीचे समन्स, २८ तारखेला राहावे लागणार हजर – ED has sent third summons to minister Anil Parab :
ईडीकडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे. ईडीने गेल्या रविवारी त्यांना नोटीस बजावून ३१ ऑगस्टला ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, परब यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळवीत गैरहजर राहिले होते. आत मंगळवारी २८ तारखेला सकाळी ११ वाजता परब यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये नमूद केले आहे. मात्र परब गैरहजर राहिल्यास ईडीकडून काय कारवाई होणार, हे पाहावे लागणार आहे.
किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी मंत्री परब यांनी १४ सप्टेंबर रोजी वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. तसेच ७२ तासांत माफी सांगितले होते. मात्र मुदत कालावधी उलटून गेल्यानंतर अनिल परब यांनी सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: ED has sent third summons to minister Anil Parab.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं