फेसबुकला भाजपा आमदाराच्या अकाऊंटवरून अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने समाज माध्यमांवर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला दणका दिला आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केलेले २ पोस्टर हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने फेसबुकला दिले आहे. या दोन्ही पोस्टरवर अभिनंदन यांचे छायाचित्र होते.
निवडणूक प्रचार आणि स्वतःच्या वातावरण निर्मितीत समाजमाध्यमांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने समाज माध्यमांसाठी काही निकष निश्चित केले आहेत. दरम्यान, समाज माध्यमांवरील राजकीय जाहिरातींच्या संबंधातील तक्रारी स्वीकारण्यासाठी एका तक्रार अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याअंतर्गत निवडणूक आयोगाने पहिली कारवाई भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या पोस्टवर केली आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी १ मार्च रोजी फेसबुकवर २ पोस्टर शेअर केले होते. यात विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे छायाचित्र होते.
यातील एका पोस्टरवर म्हटले होते की, मोदींनी इतक्या कमी वेळात अभिनंदन यांना भारतात परत आणणे, हे भारताचा मोठा विजय आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर पाकिस्तानची शरणागती, देशाचा वीर जवान मायदेशी परतला, असे म्हटले होते. या दोन्ही पोस्टरसंदर्भात निवडणूक आयोगाकडे ‘सी-व्हिजिल’ अॅपद्वारे तक्रार आली होती. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही पोस्टर हटवण्याचे आदेश दिले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं