कल्याणमधल्या मोदींच्या सभेत चर्चा रंगली ती रिकाम्या खुर्च्यांचीच

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल कल्याणमध्ये मेट्रोच्या भूमिपूजनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. मोदींच्या सभेचा प्रचंड गर्दी होईल या अपेक्षेने भाजपाचा अपेक्षा भंग झाला आहे. कारण कंटाळलेल्या स्थानिकांनी मोदींच्या सभेकडे अक्षरशः पाठ फिरवली आणि निम्याहून अधिक खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचे कटाक्ष टाकताच दिसत होते.
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने शहरात मोठ्याप्रमाणावर बॅनरबाजी केली होती. मात्र सर्वत्र गाजराची तोरणं पाहून स्थानिकांना हसू आवरत नव्हतं. त्यामुळे मोदींच्या या सभेविषयी लोकांमध्ये काहीच चैतन्य वा उत्साह नव्हता हे इथल्या लोकांच्या भावनेतून कळत होते. मोदींच्या येण्याने स्मशानभूमी बंद, विवाहाचे हॉल ताब्यात घेण्यात आल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत होता.
त्यानंतर मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी जोर लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती निराशा आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भाजपच्या हाती निराशा आली असून लोकांच्या मोदींप्रती आशा संपल्याचे हे प्रतीक म्हणावे लागेल. त्यात काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेली’मध्ये मोदींनी सभा घेतली होती. त्यावेळीसुद्धा अशाच रिकाम्या खुर्च्या सभेच्या ठिकाणी दिसत होत्या.
रायबरेलीतील रिकाम्या खुर्च्या
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं