पुतळ्यासाठी पैसे आहेत, मग नक्कीच भारताला आपण पैसे द्यायला नको: पीटर बोन

इंग्लंड : गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८५ मीटर उंचीच्या भव्य पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यावर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, जगातला सर्वांत उंच पुतळा बांधल्याबद्दल एकीकडे मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, तर विरोधक या पुतळ्यावर ३ हजार कोटी खर्च केल्याबद्दल मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. परंतु, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा या स्मारकावर टीका होत आहे.
कारण इंग्लंडच्या पार्लमेंटरिअन पीटर बोन यांनी ‘स्टेच्यू ऑफ युनिटी‘वरून भारतावर कडक शब्दांत टीका केली आहे. भारताने त्यांचे पैसे कशावर आणि कुठे खर्च करावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु, जर भारताकडे अशा भव्य पुतळ्यांसाठी खूप पैसे आहेत, तर नक्कीच त्या देशाला आम्ही पैसे द्यायला नको, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
२०१२ साली ब्रिटिश करदात्यांच्या पैशांतून १.१७ कोटी पाऊंड्सचा निधी इंग्लंडने तत्कालीन भारत सरकारला आर्थिक सहाय्य म्हणून पुरवला होता. परंतु, नंतरच्या बदललेल्या सरकारने त्यातील तब्बल ३३० दशलक्ष पाऊंड्स हे ५९७ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात खर्च केले. आमच्याकडून १.१ बिलियन पाऊंड्सचं सहाय्य घेऊन त्या रक्कमेतील ३३० दशलक्ष पाऊंड्स पुतळ्यावर खर्च करणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे, असं रोखठोक वक्तव्य बोन यांनी मोदी सरकारबद्दल केल आहे. तसंच यापुढे भारताला पैसे पुरवायला नको, हेच यातून सिद्ध होतं आहे असं ते पुढे म्हणाले.
२०१३ साली २६८ मिलियन पाऊंड्सची, २०१४ साली २७८ मिलीयन पाऊंड्सची आणि २०१५ साली १५८ दशलक्ष पाऊंड्सची मदत इंग्लंडने भारत सरकारला केली होती. या शिवाय गुजरातमधील तरुणांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी १४,००० पाऊंड्सची नगद रक्कम सुद्धा इंग्लंडने गुजरात सरकारला दिली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं