उद्या २५० गावांतील १५०० बेरोजगार झालेले कंत्राटी कर्मचारी कृष्णकुंज'वर

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर वाहू लागले आहेत आणि मोदी सरकार रोजगाराच्या मोठ्या मोठ्या घोषणा करत असलं तरी अनेक तरुण असलेला रोजगार सुद्धा गमावत आहेत असं चित्र आहे. कारण महाराष्ट्रातील मुळशी, मावळ, भिरा, खोपोली मधील तब्बल २५० गावांमधील सुमारे १५०० कर्मचाऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत.
उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजताची वेळ दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांचे नेते शिवाजी भागवत यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात काल आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘राज्यातील ३ धरणांसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना संबंधित प्रकल्पावर कंत्राटी स्वरूपात कामावर सामावून घेण्यात आले होते.
परंतु, १९९४ साली कंत्राटी पद्धतीने नवीन कामगार भरती करून या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. दरम्यान, बेरोजगार करण्यात आलेल्या कामगारांच्या पुनर्वसनासाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यावेळी संबंधित कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचं यावेळी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं. परंतु, कंपनीच्या व्यवस्थापनाणे आमची फसवणूक केल्याच यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान, सदर विषयावर राज ठाकरे यांच्या मध्यस्तीतून काही तोडगा निघतो का यासाठी राज ठाकरे यांची भेट घेऊन अडचणी मांडणार असणार असल्याचं यावेळी प्रसार माध्यमांना सांगितलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं