व्हिडिओ खुलासा! तो राजकीय पक्षाचा जमाव होता हे रेणुका शहाणेंना कोणी सांगितलं? सविस्तर वृत्त

मुंबई : समाज माध्यमांवरील अति उतावळेपणाचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. कोणाला समर्थन द्यावं आणि कोणाला देऊ नये हा ज्याचा त्याचा लोकशाहीतील अधिकार. परंतु लोकशाहीत स्वतःचे अधिकार समाज माध्यमांवर इतक्या अंध पणे सुशिक्षित लोकं गाजवतात की आपल्या हातून एखाद्याची पाठराखण करताना दुसऱ्या बाजूला आपण काय अफवा पसरवत आहोत याचं भान त्यांना होताना दिसत नाही अशी परिस्थिती आहे.
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘हॉर्न ओके प्लिज’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शारीरिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आणि एकच खळबळ उडाली. वास्तविक तिच्यासोबत खरोखरच तसा प्रकार घडला असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याची न्यायालयीन चौकशी होऊन नानांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. परंतु जर हे पुराव्यानिशी सिद्ध न झाल्यास तनुश्री दत्ताला सुद्धा कडक शासन होणं गरजेचं आहे. वास्तविक ज्या न्यायासाठी तनुश्रीने पत्रकार परिषद घेतली होती, त्यात तिने स्वतःच भारतीय न्यायालयीन व्यवस्थेवर अविश्वास व्यक्त केला होता, जे ऑन रेकार्ड आहे. मी अमेरिकन ग्रीनकार्ड होल्डर आहे आणि माझ्याकडे तिथलं नागरिकत्व आहे. त्यामुळे इथे माझ्याबद्दल कोण काय बोलतात याने काही फरक पडत नाही आणि माझ्या सुट्या झाल्या की मी पुन्हा अमेरिकेला जाणार आहे असं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, त्या पत्रकार परिषदेत तिने खाली दिलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत तिच्या गाडीवर हल्ला किंवा अडथळा करणारी लोकं हे मनसेचे कार्यकर्ते होते असा आरोप केला. त्यात भर म्हणजे रेणुका शहाणे यांनी सुद्धा तनुश्री दत्ताने संदर्भ दिलेला तोच व्हिडिओ ‘NewsMo’ या पेजवरील व्हिडिओ पोस्ट केला आणि तो जवळपास १८ लाख ४० हजारांपेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे, असा फेसबुक रेकॉर्डवर स्पष्ट दिसत आहे. परंतु धक्कादायक म्हणजे तनुश्री दत्ताने आणि रेणुका शहाणे यांनी संदर्भ दिलेला तो व्हिडिओ आणि मनसेचा काहीच संबंध नसल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर तो घटनाक्रम देखील दुसऱ्याच विषयाशी संबंधित होता हे पुराव्यानिशी समोर आला आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पत्रकाराने त्या व्हिडिओमधील सर्व विषय आणि घटनाक्रम व रेकॉर्ड सांगितला आहे.
रेणुका शहाणे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर केलेला आणि तनुश्री दत्ताने संदर्भ दिलेल्या व्हिडिओतील पत्रकारच नाव पवन भारद्वाज असून ते घटनेवेळी सहारा टीव्हीचे वरिष्ठ कॅमेरामन म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपासून व्हायरल होणार हा व्हिडिओ त्यांनी पहिला आणि त्यांना सुद्धा धक्का बसला की विषय काय होता आणि माध्यमांवर दाखवलं काय जात आहे. या संपूर्ण व्हिडिओचा घटनाक्रम आणि विषय त्याने कथन केला असून त्या घटनेचा नाना पाटेकर आणि मनसे बरोबर काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. माझं सुद्धा नावं त्या व्हिडिओमुळे खराब होत असल्याने स्पष्टीकरण देणं महत्वाचं आहे असं तो म्हणत आहे.
परंतु त्या आधी बघूया तनुश्री दत्ता काय म्हणाली होती त्या व्हिडिओचा संदर्भ देत मनसेबद्दल? कारण तनुश्रीने या व्हिडिओचा संदर्भ देत तो जमाव (मॉब) आणि त्यातील गाडी अडवणारी लोकं हे मनसेचे कार्यकर्ते होते असं म्हटलं होतं, तसेच नाना पाटेकर आधी मनसेमध्ये होते हा जावईशोध सुद्धा लावला होता. तिच्या पत्रकार परिषदेतील आरोपानुसार मनसेने स्वतःच सांगितलं होत आम्ही तनुश्री दत्ताला फिल्म इंडस्ट्रीमधून आणि शहराच्या बाहेर काढू असं सर्व रेकॉर्डवर आहे. मग तो रेकॉर्ड वरील २००८ मधील व्हिडिओ तिने प्रसिद्ध करायला हवा होता.
परंतु या विषयात दोन भाग पडतात, एक स्टुडियोच्या आतमध्ये काय घडलं? आणि दुसरं स्टुडियोच्या बाहेर काय घडलं? कारण तनुश्री दत्ता नाना पाटेकरांवर जे आरोप करत आहे तो स्टुडियोच्या आतील घटनेचा आहे. तर तिने आणि रेणुका शहाणे यांनी संदर्भ दिलेले व्हिडिओ हे स्टुडियोच्या बाहेरील आहेत, ज्यावेळी ती सेट वरून बाहेर निघून गेली आणि त्यानंतर बराचवेळ व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाऊन बसली आणि बाहेर आल्यानंतर कारमध्ये बसताना उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी तिच्या कुटुंबियांचा वाद झाला आणि त्यानंतर तो संपूर्ण घटनाक्रम घडला.
आता रेणुका शहाणे यांनी त्यांच्या पोस्टवर शेअर केलेला ‘NewsMo’ या पेजवरील नेमका तोच व्हिडिओ बघा. ‘NewsMo’ ने त्या व्हिडिओ बद्दल म्हटलं आहे की, “हाच तो २००८ मधील खरा व्हिडिओ आहे, ज्यावेळी तनुश्री दत्ता नाना पाटेकरांच्या गाण्याच्या शूटिंग सोडून निघून गेली होती आणि तिच्यावर हमला झाला होता”. ‘NewsMo’ ने त्यांच्या पोस्टमध्ये कुठेही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि गुंड असा उल्लेख केला नव्हता.
परंतु रेणुका शहाणेंनी जेव्हा तोच व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पोस्टवर शेअर केला तेव्हा त्यावर असं म्हटलं की, “कृपया हा त्या घटनेचा खरा व्हिडिओ पहा, जिथे तनुश्री दत्ताच्या कार वर २००८ मध्ये हल्ला झाला होता. जेव्हा ती ‘हॉर्न ओके प्लिज’च्या फिल्म सेटवरून बाहेर पडली होती. तिथे संरक्षणासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं, नाहीतर हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा गुंड किंवा जे काही, ज्यांना निर्मात्याने बोलावून मारण्याआधी दोन वेळा विचार केला नाही. आता त्या गाडीत तिच्या जागी तुम्ही स्वतःला, तुमच्या आईला, पत्नीला, मित्रांना, बहिणीला आणि मुलींना पहा. त्यांच्या सोबत अशी धोकादायक, भयानक, घृणास्पद गोष्ट किंवा कोणत्याही मनुष्य प्राण्यासोबत अशी घटना घडलेली आवडेल? तनुश्री तेव्हा केवळ २४ वर्षांची होती. मी या भयानक दृश्य बघून पूर्णपणे निराश झाली आहे. मला आशा आहे की तनुश्रीचा अपमान करणाऱ्या सर्वजणांना आता हे किती गंभीर होते हे समजले असेल. तिला किती वेदना झाल्या असतील. हैराण झाले….. अशी व्हिडिओ पोस्टला शब्दांची टिपणी जोडली आहे.
काय आहे ती रेणुका शहाणे यांची फेसबुक पोस्ट?
प्रश्न हा येतो की रेणुका शहाणे यांना ही गुप्त खबर कुठून मिळाली की त्या हल्ला करणाऱ्या लोकांना निर्मात्यांनी बोलावलं होतं? दुसरं म्हणजे त्यांना हे कुठून समजलं कि ते सर्व राजकीय पक्षाचे (कोणत्याही) किंवा गुंड किंवा जे काही आहेत? त्यांनी “किंवा-किंवा” शब्द इतका जोडला की त्यांना अप्रत्यक्ष रित्या समाज माध्यमांवर मनसेबद्दल रान पेटवायचं होतं? त्यानंतर त्यात फॉलोवर्स आणि वाचकांसाठी भावनिक हाक देण्यासाठी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला कारमध्ये बसण्याचा भास निर्माण केला. त्यानंतर धोकादायक, भयानक, घृणास्पद, निराश, वेदना, हैराण असे शब्द तर जोडलेच, शिवाय ती त्या घटनेवेळी केवळ २४ वर्षांची होती अशी शब्दांची अतिरिक्त जोडणी सुद्धा दिली. परंतु अशा घटना २-४ वर्षाच्या वयात असताना घडल्या किंवा वयोवृद्ध असताना घडल्या काय त्या वाईटच असतात. मग ती त्यावेळी केवळ २४ वर्षांची होती असं बोलण्यामागे कोणता भावनिक टच होता? त्यानंतर रेणुका शहाणेंनी तनुश्रीच्या मताशी सहमत नसणाऱ्यांना थेट संदेश दिला की हे किती गंभीर प्रकरण होतं. एकूणच त्यांनी या व्हिडिओ द्वारे दुसरी बाजू समजून न घेताच न्यायिक निवाडा लावला आहे असं एकूण चित्र आहे. परंतु त्यांनी थोडं संयमाने घेतलं असतं तर कदाचित दुसरी बाजू सुद्धा समजू शकली असती. किंवा त्यांच्याकडे एखादी अतिरिक्त माहिती असेल तर ती पोलिसांकडे द्यायला हवी होती.
आपण समाज माध्यमांद्वारे एखाद्याचा न्याय निवडा इतक्या सहज लावतो की ती व्यक्ती गुन्हेगारचं आहे आणि समाज माध्यमांवर जे काही दिसत आहे ते सत्यच आहे, असा समाज माध्यमांवर भास निर्माण करतो. वास्तविक तनुश्रीच्या कुटुंबीयांचा जसा विचार केला जात आहे, तसा नानाच्या कुटुंबीयांचा सुद्धा विचार होणे गरजेचे होते, परंतु तसे होताना दिसत नाही. विषय हाच आहे की न्यायालयामार्फत न्यायनिवाडा होणे गरजेचे आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याला शासन होणे सुद्धा महत्वाचे आहे. तनुश्रीने सुद्धा नानाच्या कायदेशीर नोटीसला उत्तर देणे गरजेचे आहे आणि न्यायालयीन लढाई लढणे गरजेचे आहे. परंतु पुराव्याअंती सर्व सिद्ध होण्यापूर्वी मीडिया ट्रायल किंवा सोशल मीडिया ट्रायल टाळावा, असं अनेक कायदे तज्ज्ञांना वाटतं आहे.
ही आहे त्या २००८ व्हिडिओमधील दुसरी बाजू, स्वतः सहारा टीव्हीचे वरिष्ठ कॅमेरामन पवन भारद्वाज जे त्या व्हिडिओमध्ये आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं