आधी संजय निरुपम यांच्या तिकिटाचं काय ते ठरवा: मिलिंद देवरा

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या लोकसभा तिकिटाचं काय ते ठरवा, अशी आग्रही भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री
मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केल्याचे वृत्त आहे. मागील ४ दिवसांपासून मिलिंद देवरा यांनी प्रचार प्रचार थांबवून दिल्लीत तळ ठोकला आहे. काँग्रेस पार्टीने मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून तिकीट दिले आहे. परंतु, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकिटाचा आधी काय तो फैसला करा अशी भूमिका त्यांनी दिल्लीत घेतल्याचे वृत्त आहे.
संजय निरुपम यांनी त्यांचा २०१४ चा उत्तर-मुंबई लोकसभा मतदार संघातून काढता पाय घेऊन, थेट उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतून इतरांना पहिल्यांदा तिकीट द्यावे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळेल अशी संजय निरुपम यांची राजकीय खेळी होती. परंतु, काँग्रेस पक्षश्रेठींनी निरुपम यांनी उत्तर मुंबईचे उमेदवार म्हणून अभिनेत्री शिल्पा शिंदे, अभिनेत्री आश्विनी जोशी, अभिनेता कृष्णा अभिषेक, मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा आणि मुंबई काँग्रेसच्या चार्टर्ड अकाउंट सेलचे अध्यक्ष शेखर वैष्णव या पाच नावांना नकार दिला होता. परंतु, स्वतः प्रवीण छेडा आज दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियम गरवारे हाऊस येथे भारतीय जनता पक्षात होणार प्रवेश करणार असल्याची माहिती छेडा यांनी स्वतःच अधिकृत ट्विट करून दिली आहे.
संजय निरुपम यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता मुंबई काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा करून त्यांच्या मर्जीतील २४ कार्यकर्त्यांची वर्णी लावली. तसेच जर कॅप्टनच उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ सोडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असेल, तर भारतीय जनता पक्षाला मुंबई काँग्रेसकडे उत्तर मुंबईतून उमेदवारच नाही असे प्रचारात आयते कोलीत मिळेल. त्यांचा परिणाम आमच्या निवडणुकांवर होईल अशी ठाम भूमिका मिलिंद देवरा यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडे मांडल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता दिल्लीतील पक्षश्रेष्ठी संजय निरुपम यांच्या तिकीटाबाबत काय निर्णय घेतात याकडे देवरा व कामत गटांचे लक्ष लागले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं