प्लास्टिक बंदीबाबत राज ठाकरेंचं भाष्य खरं ठरलं, पर्यावरण मंत्र्यांचा ४ दिवसात पहिला यू-टर्न

मुंबई : किराणा दुकानावरच्या आणि छोट्या दुकानदारांना लागणाऱ्या पॅकेजिंगवरची बंदी उठविण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतल्याने हा निर्णय राज्यातील प्लास्टिक बंदी संबंधित पहिला यू-टर्न ठरला आहे. कालच राज ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असं भाष्य केलं होत की, कोणतीही पूर्व तयारी न करताच अंमलात आणलेल्या प्लास्टिक बंदीच नोटबंदीसारखंच होणार आणि एक एक निर्णय फिरवले जाणार.
ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे आता किरकोळ व छोट्या दुकानदारांनाही पर्यावरण खात्याने दिलासा दिला आहे. प्लास्टिक बंदी लागू केल्यापासून रामदास कदमांनी अवघ्या चारच दिवसात स्वतःकडील खात्याच्या निर्णयात बदल करण्याची वेळ आली आहे.
सामान्य नागरिकांना प्लास्टिक पिशवी वापरण्याची बंदी कायम असली तरी किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी ही सूट देण्यात आली आहे. परंतु किरकोळ आणि छोट्या दुकानदारांना ही सूट देताना पर्यावरण खात्याने काही अति व शर्ती लागू केल्या आहेत असं रामदास कदमांनी स्पष्ट केलं.
पर्यावरण खात्याने घातलेल्या अटी;
१. प्रत्येक वस्तूच्या पॅकेजिंगवर प्लास्टिकचा दर्जा, उत्पादकाचं नाव आणि पत्ता असणं अनिवार्य करण्यात आल आहे.
२. प्लास्टिक उत्पादकांना प्लास्टिकची रिसायकल व विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा व कलेक्शन केंद्र उभारावे लागतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं