मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांच्या २ मालमत्ता जप्त

मुंबई : तीन मोठ्या सरकारी बँकांचे तब्बल ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे व्यवसायाने विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता बँकांनी जप्त केली आहे.
कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही कर्जे घेतली होती. त्यासाठी उन्मेष जोशी, माधवी उन्मेष जोशी, अनघा मनोहर जोशी आणि कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन हे त्यासाठी हमीदार होते. परंतु, ट्रस्टने कर्जे न फेडल्याने मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई बँकांनी जानेवारी आणि मे २०१७ पासून सुरू केली होती. नियमानुसार कर्जदार व हमीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तरी देखील ही कर्जे फेडण्यास ते असमर्थ ठरल्याने वित्तीय मत्तेची सुरक्षितता आणि सुरक्षा हित अंमलबजावणी नियम, २००२ मधील तरतुदींनुसार मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे, असे बँक ऑफ महाराष्ट्रच्या उप मुख्य व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात उन्मेष जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रसार माध्यमांच्या मोबाईल दूरध्वनीला आणि मेसेजला प्रतिसाद दिला नाही. तसेच यासंदर्भात मनोहर जोशी यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं