मी ४३ वर्षाच्या मैत्रीत मोदींना कधीच चहा विकताना पाहिलं नाही: प्रवीण तोगडिया

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अनेक भाषणादरम्यान आपण चहा विक्री सुद्धा केल्याच्या दावा केला होता. परंतु, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी हे सर्व दावे खोडून काढले आहेत आणि मोदींना भूतकाळात कधीच चहा विकला नाही, असं सांगत मोदींना चपराक दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर माझी तब्बल ४३ वर्ष मैत्री होती. पण त्या कार्यकाळात त्यांना केव्हाही चहा विकताना पाहिलं नाही. केवळ आणि केवळ सामान्य लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीच हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आणि मोदींना तोंडघशी पाडलं आहे.
दरम्यान, तोगडियांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन RSS आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. RSS आणि भारतीय जनता पक्षाला अयोध्येत राम मंदिर बांधायचे नाही, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर RSS नेते भय्याजी जोशी यांनी सुद्धा पुढच्या ५ वर्षात अयोध्येत राम मंदिर बांधले जाणार नाही असे म्हटल्याच्या विधानाची तोगडिया यांनी आठवण करून दिली.
परंतु, आता या देशातील सर्व हिंदूंचे डोळे उघडले आहेत आणि त्यामुळे ९ फेब्रुवारीला हिंदुंच्या नव्या पक्षाची घोषणा होईल असे ते म्हणाले. संसदेत एकदा आमच्या पक्षाला विजय मिळाला की, दुसऱ्याच दिवशी आम्ही मंदिराचे बांधकाम सुरू होईल असे तोगाडिया यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मोदी भारताच्या संसदेत तिहेरी तलाकसाठी कायदा करू शकतात, परंतु अयोध्येत राम मंदिराच्या मुद्यावर ते असं करताना दिसत नाहीत असं सांगत प्रवीण तोगडिया यांनी मोदींना लक्ष केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं