ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता

ठाणे : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले ठाणे महानगर पालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वादाचे कारण पुढे करत भोईर कुटुंबातील चारही नगरसेवक पक्षावर प्रचंड नाराज असल्याचे समजते. तसेच या निमित्ताने थेट एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ठाण्यात राजकीय बंड केलं जाऊ शकत अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
भोईर कुटुंबाने आपण शिवसेनेत येऊन पस्तावलो असल्याची भावना व्यक्त केली असून, आपण थेट मातोश्रीवर जाऊन राजीनामा देणार आहे असं म्हटलं असल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या विषयावरून सभागृहात बोलण्यास उभे राहिले तेव्हा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना हटकून ‘तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही गप्प बसा’ असं उत्तर दिल्याने संपूर्ण भोईर कुटुंब पक्षावर प्रचंड चिडलं आहे.
ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, त्यांचे सुपुत्र नगरसेवक संजय भोईर, सुनबाई नगरसेविका उषा भोईर आणि पुतण्या भूषण भोईर अशी या सर्व नगरसेवकांची नावं आहेत. मागील निवडणुकी दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु पक्षातील मिळणाऱ्या वागणुकीमुळे आम्ही शिवसेनेत येऊन पस्तावलो असल्याची त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जर ही बंडाळी सत्यात उतरल्यास आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला आणि एकनाथ शिंदेंना मोठा धक्का असेल असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं