अफझल खान सरकारला अजून ५ वर्ष देऊन बघू - उद्धव ठाकरे एवढे का नरमले?

स्वतःला शिव-शंभूंचे अवतार मानून अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे पूर्वीचे उद्धव ठाकरे आणि सध्या भाजपच्या हातात हात घालून त्यांचे गोडवे गाणारे उद्धव ठाकरे हे मराठी माणसांना रुचण्यासारखं नक्कीच नाही. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजप पुढे शड्डू ठोकून उभा असलेला सामान्य शिवसैनिक मात्र मातोश्री आदेशानंतर बुचकाळ्यात पडला आहे. सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांची शपथ देऊन आणि वचन घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा शंख वाजवला खरा परंतु असे काय नेमके घडले कि त्यांना भाजप सोबत युती करावी लागली?
खरंतर उद्धव ठाकरे म्हणजे सय्यमी तसेच चाणाक्ष अशी त्यांची ओळख, योग्य वेळेस योग्य निर्णय घेणे हि त्यांची खुबी. मोदिनामाचा सूर हळू हळू ओसरत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी भाजपवर नेहमीच आगपाखड केली. परंतु याच मोदी लाटेत त्यांचे कधीही निवडून न येऊ शकणारे नेते खासदार आणि आमदार झाले. परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये भाजपचा पराभव पाहता भाजपवर कुरघोडी करणे शिवसेनेला थोडे सोपेच झाले होते. महाराष्ट्रात आम्हीच मोठा भाऊ म्हणून मिरवणारे संजय राऊत हे कधीच जनतेतून निवडून गेले नाहीत आणि भाजप सोबत युती झाल्याबरोबर त्यांच्यासाठी तर अफझल खान अगदी जवळचा झाला.
परंतु १ प्रश्न मात्र सर्वसामांन्यांच्या मनात घर करून बसला आहे आणि तो म्हणजे काल पर्यंत भाजपला पाण्यात पाहणारे आणि एकमेकांवर यतेच्छ आरोप करणारे यांच्यात दिलजमाई झाली तरी कशी? भाजपने असा काय डाव साधला कि उद्धव ठाकरे युतीसाठी तयार झाले आणि एके काळी त्यांना वाटत असणारा अफझलखान आता अचानक प्रिय झाला.
काही जाणकारांच्या मते भाजपने उद्धव ठाकरेंना ई.डी. ची भीती दाखवत युती साठी तयार केलं. आणि तशीही त्यांची युती करतानाची पत्रकार परिषदेतील देहबोली बरंच काही सांगून जात होती. आम्ही मराठी माणसांच्या इच्छेने युती करत आहोत अशी बतावणी उद्धव ठाकरेंनी केली, परंतु युतीमुळे तर सर्वात जास्त सर्वसामान्य शिवसैनिक दुखावला तर मराठी माणसंच काय? कि उद्धव ठाकरे मराठी माणसांना गृहीत धरायला लागले आहेत? तसेही सध्या शिवसेनेचे नवीन ब्रीदवाक्य म्हणजे “उत्तर भारतियोंके सम्मान मे, शिवसेना मैदान मे” असेच काहीसे आहे.
शेवटी काय तर सामान्य मराठी माणसाला कोणी वाली नाही आणि आजतागायत त्याला सगळेच गृहीत धरत आले आहेत आणि त्यात मोठी चूक हि याच मराठी माणसाची आहे. परंतु आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी सत्तेला लाथ मारून स्वबळावर निवडणूक लढवली असती असा सूर मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर उमटू लागला.
१ मार्च मराठी भाषा दिनाच्या दिवशी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले “५० वर्ष काँग्रेसला सत्ता दिली आता अजून ५ वर्ष मोदींना सत्ता देऊन बघु”. त्यांच्यामते चौकीदार चोर होता आणि आता अचानक चौकीदार थोर झाला. परंतु पाणी कुठेतरी नक्कीच मुरतंय.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं