डिजिटल देशभक्तांचे राज ठाकरे ते वीर पत्नींच्या विरोधात विकृत अभियान: सविस्तर पुरावे

नवी दिल्ली : पुलवामामधील भ्याड हल्ल्यादरम्यान सीआरपीएफचे तब्बल ४४ जवान शहीद झाले . त्यानंतर भारतीय वायुदलाने दहशदवाद्यांच्या विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील आणि आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघालं आहे. वायुदल, लष्कर किंवा नौदल असो त्यांच्या शौर्यावर कोणत्याही भारतीयाला शंका नाही. परंतु, विषय येतो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या विकृत समर्थकांनी राबवलेल्या विकृत अभियानाचा आणि काही ठराविक लोकांविरोधात ठरवून आणि तयारीनिशी राबविलेल्या अभियानाचा.
एकूणच एअर स्ट्राईकच्या सकाळपासूनच सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी एडिटेड व्हिडिओ तसेच कन्टेन्ट तयारच ठेवले होते असा प्रत्यय येतो. काही ठराविक नेत्यांना आणि व्यक्तींना कसं आणि कोणत्याविषवरून लक्ष करायचं याची योजना आधीच तयार होती आणि भाजप म्हणजेच भारत आणि भाजप म्हणजेच लष्कर असा काहीसा प्रचार आणि प्रमोशन एअर स्ट्राईकनंतर सुरु आहे. भाजपच्या काही नेत्यांनी तर थेट एअर स्ट्राईकनंतर आमच्या लोकसभेच्या जागा आगामी निवडणुकीत वाढतील असा दावा करून लष्कराच्या नावाने स्वतःचा प्रचार सुरु केला आहे.
त्यातील एक व्यक्ती म्हणजे राज ठाकरे यांनी अजित डोवल यांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करताच सत्ताधाऱ्यांचा आयटी सेल का चवताळून उठला याचा तुम्हाला अंदाज येईल. सर्वप्रथम देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे चिरंजीव शौर्य डोवल आरएसएस आणि भाजपशी जोडल्याचे पुरावे त्यांच्याच अधिकृत वेबसाईटवर पाहा. अजित डोवल यांचे पुत्र शौर्य डोवल आणि इंडिया फाॅऊंडेशनच्या नावाने एक थिंक टँक चालवणारे शौर्य डोवलने ‘बुलंद उत्तराखंड’च्या बॅनरखाली देहरादूनमधे ‘बेमिसाल गढवाल’चा प्रचार सुरू केला. दरम्यान, आगामी लोकसभेची जागा भाजपाच्या तिकिटावर लढणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता शौर्य यांनी काहीही बोलण्यास त्यावेळी नकार दिला होता.
मागील वर्षापासून शौर्य डोवल यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा आहे. शौर्य डोवल भाजपाच्या बऱ्याच रॅली आणि कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेताना दिसत आले आहेत. परंतु, ते खऱ्या अर्थाने चर्चेला तेव्हा आले, जेव्हा ‘द वायर’ ने शौर्य डोभाल यांच्या कंपनीत एक पाकिस्तानी बिजनेस पार्टनर सैयद अली अब्बास आणि सऊदी राजकुमार मिशाल बिन अबदुल्लाह बिन तुर्की बिन अबदुल्लाज़ीज़ अल साऊद देखील पार्टनर असल्याचं वृत्त दिलं होतं. विशेष म्हणजे असे व्यावसायिक संबंध इतर कोणाचे असले असते तर भाजपने त्यांना कधीच देशद्रोही घोषित केले असत. कारण देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवल यांच्या मुलाचे थेट पाकिस्तानी नागरिक असलेल्या सैयद अली अब्बास आणि सौदीच्या प्रिंस सोबत ‘जेमिनी फाइनेंशियल सर्विसेस’ नावाने कंपनी होती. धक्कादायक म्हणजे शौर्य डोवल चालवत असलेल्या इंडिया फाउंडेशन या थिंक टॅंक मध्ये ४ केंद्रीय मंत्री निर्देशक म्हणून कार्यरत होते. त्यात स्वतः संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण देखील होत्या. तसेच दुसरं महत्वाचं म्हणजे इंडिया फाउंडेशनची स्थापना शौर्य डोवल यांनी भाजपाचे महासचिव राम माधव यांच्यासोबत केली होती.
त्यामुळेच राज ठाकरे यांनी याच विषयाचा संदर्भ पुलवामा हल्ल्यावरून अजित डोवल यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु प्रसार माध्यमांनी त्याला वेगळंच वळण दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अजित डोवल यांचा मुलगा आणि भाजपचे नेते शौर्य डोवल, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांच्या कचाट्यात येणारच होते. परंतु पुलावामाचा बदल्यात वायुदलाकडून काही दिवसांनी एअर स्ट्राईक झाला. सदर विषयाला लष्कराशी आणि एअर स्ट्राईकशी भावनिक जोडत, राज ठाकरे यांना विखारीपणे लक्ष करण्यात आले. त्याच मूळ कारण अजित डोवल यांना लक्ष केल्याचं प्रथम दर्शनी अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी मराठी भाषेत केलेले आरोप पाकिस्तानी वाहिन्यांना कसे समजले? दुसरं वास्तव हे आहे की राज ठाकरे पाकिस्तानमधील “सर्व टिलिव्हिजन न्यूजवर” हिरो म्हणून झळकत असल्याचा प्रचार केला गेला. परंतु, त्यामागील वास्तव हे आहे की GNNHD.TV हे पाकिस्तानव्याप्त पंजाबमधील मुलतान मधून चालवलं जाणारं पाकिस्तानी “न्यूज पोर्टल” आहे आणि त्याचा टिलिव्हिजन न्यूजशी काहीही संबंध नाही. त्या व्यतिरिक्त कोणत्याही पाकिस्तानी चॅनेलवर ते दाखवण्यात आल नाही. त्यासाठी आम्ही पाकिस्तानमधील सर्व टिलिव्हिजन न्यूजची यादीच तुम्हाला खाली देत आहोत आणि तुम्हीच पाहा GNNHD.TV असा कोणताही पाकिस्तानी टेलिव्हिजन नाही.
त्यात महत्वाचं म्हणजे आज अनेक न्यूज पोर्ट्लसाठी बाजारात रेडिमेड बॅकग्राउंड डिस्प्ले मिळतात, ज्यामुळे पोर्टल देखील फेसबुक किंवा व्हाट्सअँप’वर पाहिल्यास टेव्हीजन न्यूज सारख्या भासतात. सर्वात मोठा खुलासा आम्ही हा करत आहोत की, GNNHD.TV हा वेबसाईट डोमेन ‘गॉर्मेट फूड्स” या पाकिस्तानी कंपनीच्या नावाने रजिस्टर्ड असून ती एक फूड प्रॉडक्ट्स कंपनी आहे. तसेच हीच कंपनी सदर न्यूज पोर्ट्ल चालवते. त्याचा पुरावा देखील आम्ही खाली देत आहोत किंवा तुम्ही देखील “येथे क्लिक करा” आणि स्वतःच व्हिजिट करा आणि नंतर GNN पर्यायावर क्लीक करा.
त्यामुळेच कोणातरी भारतातूनच राज ठाकरे यांच्या आरोपाचे मूळ मराठीचे हिंदीत ट्रान्सलेशन करून संबंधित वेबपोर्टलला त्यांच्या मेसेंजरवरून धाडले असावे आणि त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांचा मूळ मराठीतील व्हिडिओ उर्दू बातमीत न दाखवता, केवळ राज ठाकरे यांच्या छायाचित्रांच्या काही स्लाईड जोडून ऍडमिन मेसेंजरवरील हिंदीचे उर्दूत व्हॉईसओव्हर देऊन प्रसारित केले आणि पाकिस्तानची पाठ थोपटवली. त्यानंतर हा व्हिडिओ संबंधित वेबपोर्टलवर प्रसारित होताच तो डाउनलोड करून, त्याला देखील एडिट करून ‘पाकिस्तान का नया हिरो’ अशा मथळ्याने व्हिडिओ बनवून सत्ताधाऱ्यांच्या आयटी सेलने आणि समर्थकांनी ते फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअँप’वर जोरदारपणे व्हायरल केले आणि भावनिक वातावरणात राज ठाकरे यांना देशद्रोही ठरवण्याचा विकृत प्रचार सुरु केला. मुळात तिथल्या कोणत्याही मोठ्या आणि अधिकृत टेव्हिव्हिजन न्यूजवर ही बातमी नव्हती, परंतु सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी एअर स्ट्राईकच्या नावाने भावनिक वातावरणाचा फायदा उचलत एअर स्ट्राईकच्या सकाळपासूनच स्वतःच्या पक्षाचा विखारी अजेंडा राबवला.
सत्ताधाऱ्यांच्या काही विकृत ट्रॉलर्सने अगदी वीर पत्नींना देखील सोडलं नाही, ज्यांनी स्वतःच्या घरातील अनमोल सदस्य गमावला आणि त्यानंतर देखील शांततेचा संयमी संदेश दिला. तसेच याच वीर पत्नीने तिचा पती गमावला आणि त्यांच्या चिमुकलीने तिचा बाबा आणि त्यामुळे युद्ध करण्याने काहीच साध्य होणार नाही असा मोलाचा संयमी सल्ला देताना अतिउत्साही आणि फिल्मी डिजिटल भक्तांना फटकारले, ज्यामध्ये काहीच चुकीचं नव्हतं. परंतु त्यानंतर चवताळलेल्या डिजिटल भक्तांनी त्या वीरपत्नीला देखील उपदेशाचे डोस पाजले आणि काहींनी जहरी भाषेत ट्रोल करून, त्यांनादेखील पाकिस्तानचे समर्थक संबोधण्याची मजल या ट्रोलर्सनी केली, जी अतिशय घृणास्पद आणि संताप देणारी होती. काही मिनिटात त्याच GNNHD.TV न्यूज पोर्टलवर त्या वीर पत्नीची व्हिडिओ क्लिप देखील पोहोचली हा योगायोग मानावा का? (क्लिक करा आणि पुरावा बघा) कारण त्यानंतर अनेक फेसबुक ग्रुपवर त्या वीर पत्नीला लक्ष करण्यात येत आहे, जसं राज ठाकरेंना लक्ष करण्यात येत आहे.
परंतु याच डिजिटल भक्तांनी पाकिस्तानमधील टेलिव्हिजन न्यूज चॅनेल्सवर प्रसारित झालेल्या भाजप नेत्यांच्या संबंधित बातम्या व्हायरल केल्या नाहीत. उदाहरणार्थ भाजपचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदुईरप्पा यांनी एअर स्ट्राईकनंतर आमच्या लोकसभेच्या जागा वाढतील असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर भाजपचे दक्षिणेतील सहयोगी पवन कल्याण यांनी देखील भाजप मधील सहकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी छोटं युद्ध केलं जाईल अशी माहिती दिली होती, असं धक्कादायक माहिती दिली होती. सदर विषय पाकिस्तानच्या टेलिव्हिजन न्यूजने उचलून धरल्या आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांचे डिजिटल भक्त ते व्हायरल करण्याचं धाडस करत नाहीत आणि यावरून कशाप्रकारे अभियान राबवलं जात आहे याचा प्रत्यय येतो आहे. त्यांना केवळ ठरवून आणि आखून दिलेल्या गोष्टी ते अमलात आणत आहेत, जे सत्ताधाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन लोकांनी आज स्वीकारलेल्या गोष्टीमुळे, भारतीय लोकशाही एका वेगळ्याच चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता राजकीय विश्लेषक दबक्या आवाजात व्यक्त करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं