गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या. परंरतु, ही अफवा आता खरी ठरली आहे. आज पर्रीकर यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.
मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या १५ दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं