सरकारच्या प्रतिनिधींकडून माध्यमांना खोटी माहिती, जनतेची दीशाभूल करत आहेत

राळेगणसिद्धी : मागील तब्बल आठवड्याभरापासून अण्णा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरुद्ध उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, सरकारतर्फे भेटण्यास येणारे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट झाल्यावर प्रसार माध्यमांना खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत अण्णांनी कालच्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
जर आमच्या ९० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत, असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? त्यामुळे सरकारकडून हा निव्वळ खोटेपणाचा कळस आहे़ आणि संबंधित मंत्र्यांकडून सामान्य जनतेची दिशाभूल होत असून ते इथे राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले़ आहेत.
स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचा निर्धारही अण्णांनी सोमवारी व्यक्त केला़ उपोषणाच्या ६व्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारे भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला तसेच तब्येतीची विचारपूस सुद्धा केली. सरकारने किती खोटं बोलावं याला काही सीमा आहे़त, सरकारचे जवाबदार मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत येऊन सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत. अजून ५ दिवस तरी आपणाला काही होणार नाही. वजन कमी होतंय़ थोडाफार त्रास होत आहे. पण मी उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी निकाशून सांगितले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं