अखेर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले आणि विरोधी पक्षाने सुद्धा सरकार स्थापन करण्यात रस न दाखविल्याने अखेर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
कालच भाजपने राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली होती, त्याला राष्ट्रपतींनी आज मंजुरी दिली आहे. भाजपने पाठिंबा काढल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच राज्यपाल राजवटीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या आणि त्याला अखेर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
केवळ भाजपच नाही तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोरा यांची विशेष भेट घेऊन राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही महिन्यापासून दहशदवादी हल्ले, लष्करावरील वाढते हल्ले, अशांतता तसेच भाषण स्वातंत्र्याची गळचेपी आणि त्यातूनच पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या अशा एक न अनेक घटना वाढतच असल्याने सरकारवर प्रचंड दबाव वाढला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं